गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर घोषित केला नाही ना, असा सवाल ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवेंनी उपस्थित केलाय. तर तिकडे ज्येष्ठ अभिनेत्री आणि मराठी-हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं छाप उमटवणाऱ्या सुलोचनादीदींना फाळके पुरस्कार देण्याची मागणी आता सोशल मीडियावर होतेय.